November 20, 2025
अमरावती गुन्हेगारी चिखली जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र लोणार विदर्भ

पोलीस पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या…

खामगाव : पोलीस पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पतीने गळफास घेतल्याची घटना चिखली येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार चिखली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस वर्षा कुटे या पती किशोर व दीड वर्षाच्या मुलीसोबत चिखली येथील खामगाव रोडवरील हनुमान मंदिर परिसरात राहत होत्या. पतीने वर्षा कुटे व दीड वर्षाच्या मुलीची चाकुने हत्या केली व त्यानंतर अंढरा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहेपर्यंत घटनेमागील नेमके कारण कळू शकले नाही. मात्र या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

लाडक्या बाप्पांना खामगावात श्रध्देचा निरोप!

nirbhid swarajya

संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून रोजी प्रस्थान

nirbhid swarajya

खामगाव महसूल कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप

nirbhid swarajya
error: Content is protected !!