खामगांव : आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत तथा साहित्यीक मा . प्रविणजी पहूरकर यांचा आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीने सत्कार समारंभ व त्या निमित्ताने ” चळवळीत कार्यकर्त्यांची भूमिका व आव्हाने” या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यीक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, छञपती संभाजी नगर( औरंगाबाद) यांचे व्याख्यान दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता, पत्रकार भवन, ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ येथे आयोजित केला आहे.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीती म्हणून समाज भूषण मा. अशोक भाऊ सोनोने राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ .वसंत डोंगरे आहेत.कार्यक्रमाला खामगांव व बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी, कार्यकर्त्यांनी व जेष्ठ नागरिक व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समिति कार्यकारीणी डॉ . वसंत डोंगरे, प्रा. डी.एस.वानखडे, जी. आर . मूळे, बी . सी . खंडेराव, आर . एन . वानखडे, भास्करराव पुंडकर, बी टी. इंगळे, डॉ .सुरेश सिरसाट, आनंदराव वान खडे, बी . के . हिवराळे, श्याम सावदेकर, शिवाजी झुंजारे, जे डी . झीने, प्रा. विजय खंडारे, उत्तमराव झनके, अशोक गव्हांदे, आर . आर . जवरे, नानाभाऊ हिवराळे, प्रा. जी . आर . तायडे, एस.एस. इंगळे, सिद्धार्थ वानखडे, अर्जुनराव इंगळे, रामकृष्ण सुरडकर, विनायक हिवराळे, मुरलीधर गूळधे, डि . डी . सावळे, व्हि . टी .गवई, राहुल सिरसाट,धम्मपाल गवई, रमेश कळसकार,राजू वानखडे, सुगदेवजी शेगोकार, सुगदेवराव दामोदर यांनी केले आहे.
