April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी चिखली जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ व्यापारी शेगांव

बनावट विदेशी दारू सह दोघांना अटक १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

खामगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आज २८ जुलै २०२३ रोजी चिखली रोडवर अंत्रज फाट्या जवळ दुचाकीवरून बनावट विदेशी दारूची वाहतूक करताना दोघांना पकडले त्यांचे जवळ १ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ जुलै रोजी चिखली रोडवरील अंत्रज बस थांब्याजवळ छापा मारला. यावेळी निलेश महादेव तायडे व गणेश विलास पाटील दोघे राहणार भोटा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश हे दुचाकीवरून बनावट विदेशी दारू वाहतूक करताना मिळून आले त्यांच्या जवळून विदेशी बनावट दारूच्या १८०ml च्या १२० सीलबंद बाटल्या,मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला उपरोक्त दोन्ही आरोपी विरुद्ध मदकाचे विविध कलमान्वये तसेच भांदवी कलम ३२८ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.दोन्ही आरोपींना खामगाव न्यायालयात हजर केले असता एक ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क अमरावती उप आयुक्त अ.ना.ओव्हळ, बुलढाणा अधीक्षक सौ भाग्यश्री पं जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली आर के फुसे दुय्यम निरीक्षक,व्ही एम पाटील निरीक्षक खामगाव, एन के मावळे दुय्यम निरीक्षक तसेच खामगाव कार्यालय जवान गणेश मोरे,अमोल सोळंके,परमेश्वर चव्हाण व शारदा घोगरे,संतोष एडसकर,यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर.के.फुसे दुय्यम निरीक्षक खामगाव हे करीत आहेत.

Related posts

दोन ठिकाणी वीज चोरी पकडली

nirbhid swarajya

Fashion | ‘Ironic Pink’ And 4 Other Back-To-School Trends

admin

Android Co-founder Has Plan To Cure Smartphone Addiction

admin
error: Content is protected !!