April 18, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

लक्कडगंज येथील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश…

वंचितच सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकते – गणेश चौकसे

खामगाव : येथील लक्कडगंज भागातील युवकांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे.लक्कडगंज येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, कृ उ बा स उपसभापती संघपाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तर विशेष उपस्थिती रमेश गवारगुरू, रिंकू पोपली, मोनू सलूजा, इंगळे सर, अशोक वानखेडे यांची होती.सुरवातीला महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या आचारसंहिता संदर्भात माहिती देत लक्कडगंज येथील नगरसेवक हा वंचित बहुजन आघाडीचा होईल असा विश्वास व्यक्त केला असून वंचितच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ शकते असे उदगार काढले. यावेळी अमित फुलारे यांच्यासह अनेक युवकांनीं वंचित मध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी युसूफ भाई, इम्रान भाई, प्रकाश वानखेडे, आश्विन खंडारे, भास्कर वानखेडे, गौतम वाघमारे, अनिल तायडे, संजय खंडाळकर, अमर तायडे, करण वानखेडे, करण वाघमारे, लुकमान भाई, अदनान भाई, फिरोज, दीपक महाजन, रुपेश अवचार, गोपाळ वानखेडे, आनंद तोंडे, धनराज वानखेडे, गगन वानखेडे, करण छापरवाल, सुमित छापरवाल सह लक्कडगंज परिसरात महिला पुरुष ही मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Related posts

रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांसाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

nirbhid swarajya

४४ परप्रांतीय मजुरांची घर वापसी

nirbhid swarajya

आप्पाजी डेअरी प्रॉडक्टचा गांधी चौकात शुभारंभ

nirbhid swarajya
error: Content is protected !!