खामगाव:तालुक्यातील कुंभेफळ, टाकळी, भालेगाव, ज्ञानगंगापुर, शिवारात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.परंतु अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी लाल पडून पूर्णपणे जळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून कृषी विभागाने पंचनामे करावे त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी आज दिनांक 21 जुलै 2023 रोजी कृषी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर ज्ञानदेव गायकवाड, सखाराम महाले,गजानन गायकवाड, सोपान गायकवाड,पुंडलिक कोळपे,गौरव इंगळे,श्रीकृष्ण राहणे,सुरेश इंगळे,आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक