खामगाव : शेगाव तालुक्यातील भास्तन येथील नदी पात्रातून रेती घेऊन येणाऱ्या टिप्परला २४ मे रोजी मध्यरात्री जलंब पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले मात्र महसूल कर्मचाऱ्याने मांडवली करून सोडून दिल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २४ मे २०२३ रोजी मध्यरात्री भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून रेती घेऊन येणारे टिप्पर दिसताच माटरगाव चौफुलीवर ड्युटीवर असलेले तलाठी डाबेराव यांनी टिप्परला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु टिप्पर चालक न थांबता जलंब कडे भरघाव निघून गेला त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हाती लागू शकले नाही.यानंतर हेच टिप्पर जलंब पोलीस स्टेशन हद्दीत शेगाव तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी पकडले परंतु कारवाई करण्याऐवजी मांडवली करून टिप्पर सोडून दिले सदर कर्मचारी वाहन चालक ७ भाकरे असल्याचे सांगण्यात येते परंतु त्यांनी याबाबत नकार दिला सदर टिप्पर खामगाव येथील असल्याचे समजते यासंदर्भात शेगांव तहसीलदार समाधान सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर घटनेची तलाठी डाबेराव यांनी रात्रीच माहिती दिली असून चौकशी करण्यात येत आहे.तहसीलदार यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून रेती तस्करांच्या मुस्क्या आवळाव्या अशी मागणी होत आहे.
अमरावती खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ विविध लेख व्यापारी शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक