November 20, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख

अमरावती जिल्ह्यातील अपघातात तिघे ठार, बुलढाण्यातील दोन युवक…

बुलढाणा:अमरावती जिल्ह्यात आज रात्री झालेल्या अपघातात तिघे जण ठार झाले असून मृतकात बुलढाण्यातील दोघा युवकांचा समावेश आहे. यात किमान दोन जण जखमी झाले असून चारचाकी वाहनाची मोडतोड झाली आहे.प्राथमिक माहितीनुसार बुलढाण्यातील पवन देशमुख यांचे आज संध्याकाळी अमरावती येथे लग्न होते. या लग्नासाठी त्यांचे वर्गमित्र स्विफ्ट डिझायर गाडीने अमरावती कडे निघाले असता दर्यापूर जवळ एक दुचाकीस्वार व स्विफ्ट डिझायरची धडकली.यात तिघेजण जागीच दगावले.यामध्ये दुचाकी वरील सचिन दुधांडे( लासुरा)याचेसह बुलढाणा येथिल भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर मधील प्रफुल्ल गावंडे 27 व प्रतीक राऊत 25( दोन्ही राहणार बुलढाणा)हे जागीच ठार झाले इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे समजते

Related posts

बस पुलावरून घसरली; देऊळगाव साकर्शा जवळील घटना

nirbhid swarajya

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही!

nirbhid swarajya

बैल धुण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

nirbhid swarajya
error: Content is protected !!