November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ व्यापारी शेगांव

सुटाळा बु.येथील शोरूम मधील जळालेल्या युवकाचा अखेर मृत्यू…

खामगाव : सुटाळा बु येथील एका वाहनाच्या शोरूममध्ये जळालेल्या एका ३४ वर्षीय युवकाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली.प्रसाद ज्ञानेश्वर मस्के (३४, रा. हातमाली,ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृतक युवकाचे नाव असून,तो खामगाव तालुक्यातील सुटाळा बु फाट्यावरील शोरूममध्ये व्यवस्थापक असल्याचे समजते. सुटाळा बु.येथील बजाज शोरूममध्ये पेट्रोलचा भडका उडाल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजता तो ५५ टक्के भाजला गेला होता. त्याला उपचारासाठी सुरुवातीला तात्काळ खामगाव येथे हलविण्यात आले.

मात्र प्रकृती अत्यवस्थ झाल्याने अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी देशमुख हॉस्पिटल अकोला तर्फे उके यांच्या जबाबावरून शिवाजीनगर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मृतक मस्के हा शोरूम मध्ये मॅनेजर होता सर्व आर्थिक व्यवहार त्याच्याकडे होते. त्याच्या कडे कंपनीची मोठ्या प्रमाणावर रक्कम थकली असल्याची चर्चा आहे.आणि कंपनीने रक्कम जमा करणे बाबत तगादा लावला होता.त्याच दबावा खाली त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शन खाली पो.हे.का दिनेश घुगे करीत आहेत.

Related posts

लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे माजी नगरसेवकाने केले शारीरिक शोषण

nirbhid swarajya

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी -आ.ॲड आकाश फुंडकर

nirbhid swarajya

खासदार राहुल गांधी यांनी घेतले श्रींचे दर्शन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!