November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ व्यापारी शेतकरी

बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न…

दोन संदिग्ध सीसीटिव्हीत कैद पोलीसांचा शोध सुरू….

खामगाव-: जयकिसान खाजगी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दोघांना बंदुक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना सजनपुरीनजीक घडली.सदर बाजार समितीचे कर्मचारी नितीन होतवाणी व करण ग्यानी हे दोघे काल दुपारी बँकेतून पैसे काढून जयकिसान बाजार समितीकडे निघाले होते. यावेळी सजनपुरीनजीक कल्याणजी ऑईल मिल समोर दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना अडवून बंदुक दाखवून त्यांच्या जवळील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांनी बंदुकीतून गोळी देखील झाडली. मात्र होतवानी व ग्यानी यांनी प्रतिकार करत कशी-बशी सुटका करुन घेत तेथून निघून आले. घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. यावरुन पोलिसांनी घटनास्थळ व आसपासच्या परिसरात पाहणी केली. परंतु तोपर्यंत हे भामटे पसार झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्हीची पाहणी केली असता एका सीसीटिव्हीत संदिग्ध दोघे दिसून आले. याआधारे पोलिस तपास करीत आहेत.

Related posts

मराठी प्राथामिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा मनमानी कारभार – शाळा भरते सकाळी ११ वाजता…

nirbhid swarajya

दिवसाढवळ्या चोराने केली बॅग लंपास

nirbhid swarajya

वाढदिवशीच पालकमंत्री डॉ.शिगणेंनी कोरोनाबाबत घेतला आढावा

nirbhid swarajya
error: Content is protected !!