श्रींच्या प्रगट दिन महोत्सवा निमित्त नप,शेगांव चा अभिनव उपक्रम
शेगांव -: नगर परिषद,शेगांव यांचा वतिने श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सवा निमित्य शहरात लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर शेगांव शहरात येतात त्यांना शहरामध्ये स्वच्छते संदर्भात चालू असलेल्या विविध अभियानाची व उपक्रमाबाबत माहिती होण्याकरिता शेगांव नगर परिषद कडुन श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरा कडे जाणारा गांधी चौक येथे न.प.शेगांव चे प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ.जयश्री काटकर (बोराडे) यांच्या मार्गदर्शनाखाली व उपअभियंता यांत्रिकी व पर्यावरण तसेच आरोग्य विभाग प्रमुख संजय मोकासरे यांच्या नेतृत्वाखाली साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ,पातुर व नगर परिषद ची स्वामी विवेकानंद इंग्लीश ज्ञानपिठ शाळेचा विद्यार्थ्यांकडून व बालकांनी विविध वेशभुषा करुन स्वच्छते संदर्भात विविध कार्यक्रमातून जनजागृती केली आणि मंडळाच्या वतीने स्वच्छतेबाबत कीर्तन करून व लोकगितातुन आणि पथनाट्याव्दारे जनजागृती करण्यात आली त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० बाबत माहिती, शिक्षण व संवाद (IEC) उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील व दुकाना मध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका व घातक कचरा वेगवेगळा करावा

