April 11, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

पेपरला गेला अन मोबाईल गेला चोरीला, अन विद्यार्थीचं निघाला चोर….

खामगाव: परीक्षा केंद्रावरून सहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेल्या एका मोबाइलचा बुलढाणा येथील सायबर क्राईम पथकाने छडा लावला.मिळालेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील अटाळी येथील गोपाळ दयाराम बेंडे (१९) हा विद्यार्थी गो. से. महाविद्यालयात बी. कॉम. भाग २ ला शिक्षण घेत आहे. ७ जुलै २०१२ रोजी परीक्षेला जाण्यापूर्वी त्याने त्याच्या जवळचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल बॅगमध्ये ठेवून तो हॉलमध्ये गेला.परतल्यानंतर त्याने ठेवलेला मोबाइल आढळून आला नाही.त्यावेळी त्याने व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारणा केली असता सर्व विद्यार्थ्यांनी माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे गोपालने शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सीडीआरनुसार मोबाइलमध्ये रामेश्वर ज्ञानदेव मांगटे (रा. लासुरा बु, ता. शेगाव)यांचे सिम कार्ड चालू असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून त्यांचा मुलगा गौरव रामेश्वर मांगटे याला २७ जानेवारी रोजी शहर पोलिसांनी अटक केली.त्याच्या जवळून चोरी गेलेला मोबाइल जप्त करण्यात आला.आरोपीसुद्धा पेपर देण्यासाठी आला होता.या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनात नापोक मनोहर गोरे,पोका.प्रफुल टेकाळे यांनी केला.

Related posts

लॉकडाऊन मध्ये आपले साहित्य घेऊन मजूर निघाले गावाकडे

nirbhid swarajya

मनसे न.प. घंटागाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त १८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!