November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी “भारत नेट” चा कारभार चालतो फक्त व्हाट्सअप वरच…

खामगाव: तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत नेट’ या मोहिमेसाठी सरकारने ग्रामीण भागात ऑप्टिकल फायबरमार्फत इंटरनेट पोहोचवण्यासाठी ‘भारत नेट’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.तालुक्यातील ग्रामपंचायती ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून ज्या ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आल्या आहेत त्या खंबा वरून खाली पडल्या च्या घटना घडत आहेत.या कडे खामगाव तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी संदीप पायघन (इंजिनीयर)हा उपविभागीय कार्यालयाच्या सेतु व दुसऱ्याच कामात व्यस्त असतो त्याचे काम गेल्या वर्षांपासून सुरू आहे.भारत नेट चे टेक्निकल व ग्रामपंचायत ला नेट जोडणी ची कामे फक्त व्हाट्सअप वरच सुरू आहेत.भारत नेटची काम रखडल्या मुळे ग्रामपंचायत मधील ऑनलाईन कामांवर भारत नेट च्या कंत्राटी इंजिनीयर च्या गलथान कारभारा मुळे कामे होण्यास विलंब होत आहे.भारत नेट च्या गलथान कंत्राटी इंजिनीयर यावर वरिष्ठ चा वचक राहिला नाही की तो वरिष्ठांना घाबरत नाही, जबाबदार कोण? आता मात्र, भारत नेट कामाला गती मिळणार असून तसे चित्र दिसून येत नाही. गेल्या वर्षभरात या प्रकल्पाची कामे रखडली असल्याने त्यातून ग्रामपंचायतीचा कारभार गतिमान होईल की नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.मात्र ही सेवा सुरळीत करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे.

डिजीटल इंडिया योजनेच्या माध्यमातून इंटरनेटची गती वाढवून कामात पारदर्शकता आणण्यासाठी भारत नेट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.यामुळे कामाची गती १०० पटीने वाढणार आहे.भारत नेट प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला फायबर केबल मदतीने जोडण्यात येणार आहे.यासाठी लॅटीट्यूड आणि लँगिड्यूड लोकेशन घेण्यात आले आहे.यामुळे ग्रामपंचायतीची नेट कनेक्टिव्हिटी १०० एमबीपीएस कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे इंटरनेटची स्पिड वाढणार आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या माध्यमातून कामकाजाची गती वाढविण्यासाठी उभारले जाणार आहे.

Related posts

बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा संकल्प

nirbhid swarajya

जिल्ह्यातील ९७ अधिकारी उद्या सामूहिक रजेवर

nirbhid swarajya

लाखनवाडा परिसरात भुईमुग काढणीला वेग

nirbhid swarajya
error: Content is protected !!