January 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

आठ लाखाचा गुटखा घेऊन जाणारी कार जप्त ; चालक फरार…

खामगाव: शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुमारे सव्वा लाख रुपयांच्या गुटख्याची तस्करी होत असल्याचे संशयित वाहन शहर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आले. कार चालक फरार होण्याच्या बेतात असताना शहर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून कार सह सात लक्ष ८४ हजार ४४० रुपयाचा मुद्देमाल सिनेस्टाईल पद्धतीने पकडला. सदर कारवाई आठवडी बाजारात सात डिसेंबरच्या रात्री साडेतीन वाजेदरम्यान करण्यात आली. कारचालक फरार होण्यात यशस्वी झाला आहे. खामगाव शहरातील आठवडी बाजारातून एका पांढऱ्या रंगाच्या आलिशान कार मधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात होती. त्याचवेळी शहर पोलीस स्टेशनचे एक पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना हे संशयित वाहन दिसून आले दरम्यान चालकाने पोलिसांना पाहून एक लक्ष १४ हजार ४४० रुपयाचा प्रतिबंधित गुटखा असलेले वाहन घटनास्थळावरून पळविण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने ठराविक अंतरावर वाहन थांबवून चालकाने घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यासह सहा लक्ष रुपयाची आलिशान कार आणि मोबाईल जप्त केला एएसआय मोहन करुटले यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाविरुद्ध गुन्हा ; पोलीस पाठलाग करीत असल्याचे निदर्शनात येताच प्रतिबंधित गुटखा असलेल्या कारचालकाने पोलिसांनी त्यांचे वाहन गाठण्यापूर्वीच एका ठिकाणी वाहन थांबवले चालकाने वाहन तसेच सोडून पळ काढला दरम्यान वाहनातील मोबाईल आणि अन्य पुराव्याच्या आधारे शहर पोलिसांनी खलील उल्ला खान रहेमत उल्ला खान राहणार मेहबूब नगर यांच्या विरोधात भा द वि कलम ३२८,१८८,२७२,२७३, आणि अन्नसुरक्षा मानके कायद्याच्या विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे.

Related posts

बारादरी भागात पावसामुळे घर झाले जमीनदोस्त ; मोठे नुकसान

nirbhid swarajya

अडकून पडलेल्या नागरिकांना घरटे जवळ करण्यासाठी एसटी सज्ज

nirbhid swarajya

खामगांवात सीसीआय चे तीन खरेदी केंद्र सुरु

nirbhid swarajya
error: Content is protected !!