November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

४२ जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पकडले…

खामगाव -: निर्दयीपणे कोंबून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर शहर पोलिसांनी काल अकोला बायपासजवळील बाळापूर नाक्यावर पकडला. सदर वाहनात ४२ जनावरे आढळली असून कोंबल्या गेल्याने यातील २ बैलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून सर्व ४० जनावरे लांजुळ येथील गौरक्षणला जमा करण्यात आली आहेत. एका कंटेनरमधून अनेक गुरांना कोंबून वरणगावकडे नेण्यात येत आहे, अशी गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी अकोला बायपासवरील बाळापूर नाका येथे नाकाबंदी करुन कंटेनर क्र. एमपी०४ जीबी६२८८ ला थांबवून पाहणी केली असता त्यात निर्दयीपणे कोंबून जनावरे घेवून जाण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी हे कंटेनर घेवून जाणारे फारुख खा. हाफीज खा (२५), जमील खान जलील खान (३०) दोन्ही मध्यप्रदेश यांना अटक करुन जनावरांचे कंटेनर थेट पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले व तेथे सर्व जनावरे बाहेर काढण्यात आली. यापैकी २ बैलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तर अनेक जनावरे जखमी झाली आहेत. त्यांच्यावर उपचार करून ४० जनावरे लांजूळ येथील गौरक्षणला जमा करण्यात आली आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उपरोक्त दोघांविरुध्द कलम ४२९.३४ भादवी सहकलम प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणे अधिनियम १९६०चे कलम १९(१) (घ) (४) (च) (ज) (2) (झ) सहकलम महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

कापूस लागवडीवर बंधने आणू नका – आ.ॲड आकाश फुंडकर

nirbhid swarajya

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

घराचे कुलूप तोडून 54 हजाराचा मुद्देमाल लंपास; आरोपी अटकेट

nirbhid swarajya
error: Content is protected !!