January 4, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण शेगांव सामाजिक

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड…

लीड स्कुलिंगद्वारे शिक्षण देणारी जिल्ह्यातील एकमेव शाळा

विद्यार्थी व पालकांचा वाढता प्रतिसाद

खामगाव: अल्पावधीत नावलौकिक मिळविणाऱ्या आवार येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील शाळांपेक्षाही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी नर्सरी पासून ते दहावीपर्यं नवीन टेक्नॉलॉजी लीड स्कुलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टीव्ही स्क्रीन व सर्व शिक्षकांना टॅब आणि आणि टीव्ही याला नेट सर्वर जोडून शिक्षण देण्यात येत आहे. अशी आधुनिक लीड स्कुलिंग शिक्षण पद्धती आणि टेक्नॉलॉजी वापरणारी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर ही संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव शाळा ठरली आहे. याचा परिणाम म्हणजेच चालू सत्र 2022- 23 मध्ये पालकांच्या भरभरून प्रतिसादामुळे जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर मध्ये ऍडमिशन कोटा पूर्ण झाला आहे.जिल्हयात नाविन्यपुर्ण शिक्षण उपक्रमास सुरवात करणारी जिल्हयातिल प्रथम शिक्षण संथा स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक बहुद्देशिय संथा द्वारा संचालीत जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अॅण्ड गुंजकर कॉमर्स सायन्स ज्युनिअर कॉलेज आवर ता. खामगांव येथे लीड स्कुलिंग ही शिक्षण पद्धत वापरली जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यामध्ये नियमितपणे शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. या काळातही विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राधान्याने विचारात घेवून दैनंदिन अध्ययन अध्यापनाव्यतिरिक्त घरी राहून विविध माध्यमाद्वारे शिक्षण सुरू ठेवण्याचे सर्वोतोपरी जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलर्स अॅण्ड गुंजकर कॉमर्स सायन्स ज्यू कॉलेज आवार च्या माध्यमातुन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये नियमितपणे शाळा सुरू होणार ,हे लक्षात येताच टप्प्या-टप्प्याने नियोजनबद्ध पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि त्याआधारे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी करणे आवश्यक होते. शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साध्य करण्याच्या हेतूने शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवविणे आणि अपेक्षित ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे, हे संस्था अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर यांच्या लक्षात येताच संस्थेच्या वतीन जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स व गुंजकर कॉमर्स सायन्स ज्यु कॉलेज आवर येथे राज्यात सर्वत्र चर्चीत असलेली लिङ स्कुलिंग ही अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात आली.
या माध्यमातुन ग ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना शहरी भागातील माहागडया शिक्षण पध्दती प्रमाणे शिक्षण उपलब्ध करण्याची सोय करण्यात आली. ग्रामीण भागतील तसेच संपूर्ण जिल्हयातील एकमेव शाळा लिडीग स्कुल म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांची सत्र २०२२ – २०२३ मधील MOY (First term) मध्ये विद्यार्त्यांन मध्ये दिसून येणारी प्रगती ही अमुलाग्र आहे. हे पाहता या लीड स्कुलींगला पालकाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पसंती मीळत आहे.ही शिक्षण पद्धती साधी व सोपी असुन विद्यार्थ्यांना समजेल त्या भाषेत शिक्षण पोहचविल्या जाते.या माध्यमातुन विद्यार्थ्याला हवे असलेले शिक्षण व त्या विद्यार्थ्यांचा असलेला शिक्षणा मधला रस व उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने घेण्यात येणारे विविध उपक्रम व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वर्गात मीळणारे विविध साहीत्य तसेच विविध वर्कशिट च्या माध्यामातुन विद्यार्थ्या कडुन करुण घेतलेले प्रोजेक्ट तसेच SLC सारखे उपक्रम शाळेत नियमीत राबवीले जातात.या माध्यामतून विद्यार्थ्यांना भविष्यातील एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचे कार्य जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स करत आहे. या शिक्षण पध्दतीत Multimodal Learning, Smart Class room, Grade- Wise Activity kits,Books with Digital Visualization आशा घटकांचा समावेश आहे. या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातुन दिसुन येत असलेला बदल हा उत्तम आहे. या शिक्षण प्रणालीच्या माध्यमाने शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक यानां सुध्दा नविन शिक्षणाचे महत्व लक्षात येत असुन व आवड निमार्ण होत आहे. तसेच लिड शिक्षण प्रणाली मुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासाची गोडी निमार्ण करण्याचे कार्य शिक्षक करीत आहे. रोज नवनविन उपक्रम करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असतात. या मध्ये प्रत्यक विद्यार्थ्याकडे वैयक्तीक लक्ष देणे सोपे झाले आहे. सदर लीड शिकक्षण तंत्रज्ञानामुळे शाळेच्या विद्यार्थी संखेत मोठया प्रमाणात वाढ झाली व सतत हि वाढ होत आहे.नवीन शैक्षणिक वर्षात संस्थेच्या वतीने लिड स्कुलींग सोबत विद्यार्थ्यांच्या हिताचे नविन उपकम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी दिली आहे.

Related posts

शॉक लागून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु

nirbhid swarajya

मलकापुर शहर केले सील

nirbhid swarajya

कंपनी , कंत्राटदारानी परप्रांतीय मजुराना सोडले वाऱ्यावर

nirbhid swarajya
error: Content is protected !!