April 19, 2025
अकोला खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय

भूमिहीन व अतिक्रमण धारकांना वंचित कडून आवाहन

खामगांव :- मुंबई उच्च न्यायालयाने दि. 06 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील 6 महसूल विभागातील 358 तालुक्यातील गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणे संबंधीची कार्यवाही महाराष्ट्रात सुरू झाली असून याच कारवाईचे आदेश देणाऱ्या नोटिसा अतिक्रमण धारकांना खामगांव तहसीलदार व नगर परिषदच्या वतीने जागा खाली करण्यासाठी देण्यात आल्या असून त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी दिला आहे. सदर अतिक्रमण धारक हे मागील अनेक पिढ्यांपासून त्या ठिकाणी राहतात यातील 70% अतिक्रमण धारक आपल्या कुटुंबासोबत राहात असून रहिवासासाठी ती जागा वापरत आहेत. तसेच हे सर्व अनुसूचित जाती – जमाती, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त मायक्रो ओबीसी या प्रवर्गातील आहेत भूमिहीन कामगार मजूर वर्गातील आहेत. सर्व खामगांव शहरासह तालुक्यात या नोटीसा आल्यामुळे लोक ही समस्या सोडविण्यासाठी अडचणी येत होत्या. या अडचणीचे निवारण करण्यासाठी
वंचित बहुजन आघाडी तर्फे वंचित बहुजन वर्गातील शासकीय / गायरान अतिक्रमित जमिनीवर ज्यांची घरे आहेत अश्या अतिक्रमण धारकांसाठी जमीन नावावर होण्याचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे आवाहन करण्यात येते की, गायरान शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांनी जास्तीत जास्त संख्येने सदरचा अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संघपाल जाधव,9503544506 कृ.उ बाजार समिती माजी संचालक राजेश हेलोडे 9922476664, तालुकाध्यक्ष प्रभाकरजी वरखेडे 9970705565, खामगाव शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे 9604287215, शहर उपाध्यक्ष हर्षवर्धन खंडारे 9975777208, अमन हेलोडे 9552666491, मुख्य संघटक शहर, महिला जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग 9922459895, युवक तालुकाध्यक्ष अमोल शेगोकार 8668759374 यांच्याशी संपर्क करावा किंवा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावरती येऊन सदर अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

फिजिकल डिस्टन्सिंगसाठी छत्री पॅटर्न

nirbhid swarajya

अपघातात पोलीस कर्मचारी संतोष राजपूत यांच्या जागीच मृत्यू…

nirbhid swarajya

प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!

nirbhid swarajya
error: Content is protected !!