ठाणेदार यांच्या हस्ते सुरक्षा समितीचे लावण्यात आले फलक
खामगाव:पोलीस स्टेशनमध्ये येणारी मुलगी, महिला यांना धीर मिळावा, आपल्यावर झालेला अत्याचार कोणतीही भीती, संकोच न बाळगता पोलीसांना तिला सांगता यावा यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तिच्या मदतीसाठी महिला सुरक्षा समिती आवश्यक असते. ज्यांना पूर्वी महिला दक्षता समिती असे संबोधले जायचे. पीडित महिलेसोबत पोलिसांसोबत कोणी महिला तिच्यासोबत उभी राहली तर संवाद साधणे सोपे होते. यामध्ये मानसिक आधारासोबतच समुपदेशनाची भूमिका महत्त्वाची आहे. हीच भूमिका महिला सुरक्षा समित्यांची आहे या अनुषंगाने शहरांमध्ये विविध खामगाव शहर पोलीसांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत महिला सुरक्षेसाठी महिला सुरक्षा सदस्य म्हणून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्थापना मालक यांना सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तर त्यांच्याकडे दामिनी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर देऊन त्यांनी महिला संबंधी घटना घडल्यास पथकाशी संपर्क साधून महिलांना सुरक्षा प्रदान करावी. यासाठी शहरातील बस स्थानक,आठवडी बाजार, महाविद्यालय यासह इतर सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.त्यांच्या प्रतिष्ठान वर तसे फलक सुद्धा लावण्यात येत आहे.यांच्यामार्फत महिलांना सुरक्षा देण्यासाठी यांची नेमणूक करण्यात येत आहे. यामध्ये दामिनी पथक सतत या महिला सुरक्षा सदस्यांच्या संपर्कात राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना सोबत अनुचित प्रकार घडल्यास योग्य मार्गदर्शन व सहकार्य होणार आहे.सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा म्हणून हे सदस्य काम करणार आहेत.आजपासून शहरामध्ये या समित्या कार्यरत असणार आहेत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या हस्ते खामगाव येथील बस स्थानकावर महिला सुरक्षा समितीचे फलक लावून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन,ना पो.का.संतोष वाघ,पो हे का रमेश भामोतकर,महिला सुरक्षा समिती सदस्य माधव शिरफुलें उपस्थित होते