November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र विदर्भ शेगांव

वर्दळीच्या मार्गावर महामंडळ बसचा ब्रेक फेल मोठा अपघात टाळला…

शेगाव: तालुक्यातील जलंब येथील रेल्वे गेट बंद असल्याने वाहतूक काही वेळ बंद होती.एसटी बस सह अनेक लहान मोठीं वाहने उभी होती.बस चा ब्रेक नाकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले बस ही सरळ मागील वाहनाशी धडकली या मध्ये दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला.एमएच ४० एन ९१२१क्रमांकाची महामंडळ ची बस माटरगाव वरून शेगावकडे जात होती.जलंब येथील रेल्वे गेट वर असताना बसचे ब्रेक फेल झाले. सुदैवाने यावेळी तेथे वाहनांची वर्दळ कमी होती.कुणीही नागरिक जखमी झाले नाही. बसमध्ये शाळकरी मुलांसोबत अनेक प्रवासी होते.बस चालक ड्रायव्हर यांना विचारणा केली असता त्यांनी ब्रेक फेल झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे यावेळी त्या सर्व प्रवाशांना इतर नागरिक यांनी मदत केले.अपघातामुळे तेथे मोठी गर्दी जमली आणि गोंधळही निर्माण झाला.या मार्गावरील वाहतूकीत अडथळा निर्माण झाल्याने जलंब पोलीस तेथे पोहचले व बस ही ठाण्यात लावण्यात आली होती.वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता हे विशेष.

Related posts

सामान्य रुग्णालयाच्या उपक्रमाला मिळाली खामगाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माळी समाज महिला मंडळाची साथ

nirbhid swarajya

In Kogonada’s ‘Columbus Modern Architecture

admin

‘मुंबईसह राज्यातून होणारा हिरे व्यापार ९७ टक्क्यांवर पोहोचला, मुंबईसमोर सूरतही मागे पडले’

nirbhid swarajya
error: Content is protected !!