January 6, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शिक्षण सामाजिक

प्रसाद डांगे ची वैद्यकीय शिक्षणाकरीता निवड….

खामगाव: तालुक्यातील वाडी येथील राजुभाऊ डांगे सौ.लता डांगे यांचे चिरंजीव प्रसाद डांगे याची वैद्यकीय शिक्षणाकरीता मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली असून, त्‍याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. नीट एक्‍झाममध्ये ७०० पैकी ६०३ गुण संपादन त्‍याने केले होते. पहिल्‍याच चाचणीत त्‍याची ही निवड झाली आहे. प्रसाद याने खामगाव येथील एसएसडीव्‍ही शाळेमध्ये शिक्षण घेत दहावीमध्ये ९१.२० गुण संपादन केले होते. तर त्‍याने पुढील शिक्षण अकोला येथील समर्थ ज्‍युनिअर कॉलेज येथे सायन्‍स अकरावी बारावी करुन ललीत टीटोरीअल अकोला येथील काळपांडे सर यांच्‍याकडे परिक्षेचे क्‍लासेस करुन त्‍यांच्‍या मार्गदर्शनामध्ये नीटचे शिक्षण घेतले आहे. शांत धीर गंभीर स्‍वभावाचा प्रसाद हा लहानपणापासून कमीत कमी बोलणारा पण अभ्यासात नियमिता ठेवणारा होता. त्याने भविष्यामध्ये डॉक्‍टर होवून खऱ्या अर्थाने रुग्‍णसेवा करण्याचा फार पुर्वीपासून त्‍याचा मानस होता. आपल्‍या स्‍वप्‍नाला साकार करणाऱ्या प्रसादची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड होताच त्‍याचे सर्वत्र अभिनंदन व कौतूक होत आहे. तो आपल्‍या यशाचे श्रेय आपल्‍या आई,वडील, परिवार तसेच गुरुजणांना देत आहे.

Related posts

बोगस बियाणे विकून शेतक-यांची फसवणुक करणा-या कंपन्यांचे परवाने रदद करा – आ.फुंडकर

nirbhid swarajya

अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनीत घाणीचे साम्राज्य

nirbhid swarajya

बाजार समितीतील संभाव्य प्रशासकांची यादी जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!