January 1, 2025
गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव

राजपुताना ट्रॅव्हल्स च्या धडकेत वृद्धाचा मृत्यू , ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा दाखल…

शेगाव: राजपुताना ट्रॅव्हल्सच्या धडके दरम्यान 85 वर्षीय वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत माहिती अशी की धनेगाव तालुका बाळापूर हल्ली मुक्काम वारकरी नगर शेगाव येथील हरिश्चंद्र पांडुरंग लांडे वय 85 वर्ष हे वृद्ध इसम स्थानिक बाळापुर रोडवरील श्री गजानन महाराज चित्रकला महाविद्यालय चौकातून रस्ता ओलांडत असताना खामगाव कडून आलेली व बाळापूर मार्गाने जात असलेली राजपुताना लक्दारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एन एल ०१ B १८६०च्या धडकेने ते गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालययेथे दाखल करण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले घटनेच्या वेळी उपस्थित नागरिकांनी ट्रॅव्हल्स चालकाला चोप दिला. सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय सुभाष वाघोले साहेब हे त्यांच्या पोलीस सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचून त्यांनी त्यावेळेस बस चालक बद्रीनाथ तुकाराम परीहार राहणार अंचरवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा याला ताब्यात घेतले व ट्रॅव्हल्स बस जप्त करून शेगाव पोलीस स्टेशनला आणून उभी केली याबाबत शेषराव विष्णू हिंगणे राहणार वारकरी नगर शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम २७९,३०४ए आयपीसी अन्वये गुन्हा दाखल केला आहे तपास पीएसआय सुभाष वाघोदे साहेब करीत आहेत.

Related posts

आमदार अँड.आकाश फुंडकरांच्या शुभहस्ते सेवा पंधरवाडा निमित्त गरजू अपंगांना साहित्य वाटप…

nirbhid swarajya

तलावात आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

nirbhid swarajya

ठाकरे कुटूंबियांकडून कोरोना योद्धाचा सत्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!