November 20, 2025
जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव संग्रामपूर सामाजिक

जळगांव जामोद येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका व दर्शन सोहळा…

जळगांव जामोद:जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अंनत श्री विभूषीत जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळया चे आयोजन शनिवार दि.५ नोव्हेंबर रोजी जनक नगरी ले-आऊट श्री गोपाल कृष्ण, गौरक्षण जवळ, नांदुरा रोड,जळगांव जामोद, ता.जळगांव जामोद. जि.बुलढाणा बुलढाणा येथे सकाळी ९ वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिठ प्रमुख. श्री.कुंडलिकराव वायभासे साहेब, व्यवस्थापक श्री.सुरेश मोरे साहेब.तसेच निरीक्षक श्री.गणेश देशमुख जिल्हाअध्यक्ष श्री.गणपत राठोड यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मोफत रुग्णवाहिका सेवा – महाराष्ट्रात विविध महामार्गावर ३७ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन,महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, ब्लड इन नीड,रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.सदर्हु कार्यक्रमात दुर्बल घटक उपक्रमांअंतर्गत शेळी वाटप करण्यात येत आहे.या कार्यक्रमासाठी बुलढाणा जिल्ह्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व सर्व सेवाकेंद्र सदस्य,आरती केंद्र सदस्य व भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी दि.५ नोव्हेंबर
रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे गुरुपुजन करण्यासाठी तसेच उपासक दिक्षा घेण्यासाठी जळगांव जामोद.येथे उपस्थित रहावे.पादुका दर्शन सोहळयासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दिवशी दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे.तरी या महन्मंगल समयी सर्व भाविकांनी उपस्थित राहून परम पूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रवचनाचा व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा निरीक्षक जिल्हाध्यक्ष, व तालुका अध्यक्ष जिल्हा सेवा समिती पदाधिकारी यांनी आवाहन केले यांनी केले आहे.

Related posts

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा खटला महाराष्ट्राने जिंकला

nirbhid swarajya

Financial Gravity Hosts AI Design Challenge For Tax Planning Software

admin

जिल्ह्यात आज प्राप्त 325 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 88 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!