November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ सामाजिक

काशीराम वाघमारे यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर…

लाखनवाडा: प्रतिनिधी कृष्णा चौधरी लाखनवाडा येथील रहिवासी असलेले व सध्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरीअडगाव येथे कार्यरत असलेले काशीराम वाघमारे यांना परिवर्तन सामाजिक संस्था पुणे च्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे काशीराम वाघमारे हे साहित्यामध्ये अमरावती विद्यापीठामध्ये पीएचडी करत असून ते उत्तम वक्ते व साहित्यिक आहेत पुरस्कार जाहीर करताना संस्थेने वाघमारे यांचे आतापर्यंतचे सामाजिक शैक्षणिक व साहित्यातील कार्य लक्षात घेतले आहे ते शाहू फुले आंबेडकर तसे बहुजनवादी विचारधारा शिरोबिंदू माणून मानवतावादी चळवळीत सक्रिय सहभागी आहेत.या पुरस्काराचे स्वरूप राज्यस्तरीय असून रोख रक्कम शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन त्यांना पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त 27 नोव्हेंबर ला महात्मा फुले यांच्या वाड्यात सन्मानित करण्यात येणार आहे.खरा शिक्षक दिन हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे या भारत देशाला नवीन दिशा देणार आहे खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले या देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि म्हणून त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि त्यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील मोजक्या बहुजनवादी चळवळीतील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव व्हावा.या उद्देशाने ‘लोकहितासाठी परिवर्तन चळवळ’ हे ब्रीद घेऊन ही परिवर्तनवादी सामाजिक संस्था पुणे व महाराष्ट्रभर कार्य करत आहे. बहुजन विचाराचे पाईक म्हणूनआदर्श शिक्षकांचा गौरव संस्थेला करायचा आहे.त्यासाठी काशीराम वाघमारे यांचे सामाजिक साहित्य तथा शैक्षणिक कार्य लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार पत्रकार परिषद घेऊन पुणे येथे नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे तसे पत्र संस्थेच्या वतीने देऊन कळविले आहे

Related posts

शनिवार व रविवार जिल्ह्यात राहणार कडक ‘कर्फ्यु’

nirbhid swarajya

मकावर औषधी टाकतांना 5 जणांना विषबाधा;एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू,

nirbhid swarajya

खामगावातील खाजगी रुग्णालये अधिग्रहित

nirbhid swarajya
error: Content is protected !!