November 20, 2025
खामगाव जिल्हा पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ

जिल्हयात अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट होण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी ….

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांची मागणी…

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील सर्व गरीब नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी १३ ऑक्टोबर रोजी वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून केली आहे.सदर निवेदनात नमूद केले आहे की,सध्या नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत बिपीएल / एपीएल (धान्य) मिळण्यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे अर्ज माहिती नसल्यामुळे तसेच शेत मजुर शेती कामात अडकल्यामुळे अद्यापही बहुतांश गरीब नागरिकांचे संबंधीत कार्यालयात अर्ज सादर झालेले नाही. तसेच अन्न सुरक्षा योजने अंतर्गत करण्यात आलेला सर्व्हे ५ वर्षे जुना होता. मागील ५ वर्षात झालेल्या सर्व्हेमध्ये भरपुर नागरिक सरकारी नोकरी, धनाढ्य व्यक्ती व ज्यांच्याकडे शेती आहे अशा व्यक्तींची नावे आहेत. तरी अशा व्यक्तींना वगळून गरीब लोकांची नांवे समाविष्ट करण्यासाठी सदर योजनेला ३१ डिसेंबर २०२२ पावेतो मुदतवाढ देण्यात यादी व तहसील कार्यालय मार्फत शिबीरे आयोजीत करून शहरी व ग्रामीण भागात अर्ज घेण्याचे आदेश संबंधितांना व्हावेत व छाननी करून गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे.अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको तसेच तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल व त्यापासून उद्भवणाऱ्या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील अशा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी निवेदनातून केला आहे.l फोटो – गणेशभाऊ चौकसे

Related posts

चिमुकल्याचा गळफास लागल्याने दुर्देवी मृत्यू

nirbhid swarajya

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेचा शुभारंभ

nirbhid swarajya

बुलढाणा अर्बन च्या वतीने वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!