November 20, 2025
क्रीडा खामगाव बातम्या

हटकर गरबा उत्सव २०२२ उत्सव मंडप भूमिपूजन शुभारंभ

खामगांव:नवरात्री आणि जगदंबा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे देवी मातेच्या आशीर्वादाने शिवनेरी ग्रुप च्या वतीने ह्यावर्षी सुध्दा शाळा क्र.६ टाॅवर चौक खामगाव येथे गरबा उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने हटकर हॉस्पिटल गरबा उत्सव २०२२ च्या उत्सवाच्या मंडपाचा भूमिपूजन शुभारंभ आज करण्यात आला

भूमिपूजन कार्यक्रमाला खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सनमानिय आमदार ऍड. आकाश दादा फुंडकर, हटकर हॉस्पिटलचे संचालक सन्मा.डॉ. पांडुरंग हटकर साहेब, न.प चे माजी नगर उपाध्यक्ष महेंद्रकाका रोहनकर, शाळा क्र.६ चे मुख्याध्यापक श्री.घोपे सर, रतनाताई डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.ह्या मंगल प्रसंगी शिवनेरी ग्रुपचे संस्थापक रवी जांगीड तालुकाध्यक्ष किशोर लोखंडे, शहराध्यक्ष अभिषेक रोहणकार, गरबा उत्सव समिती प्रमुख प्रतीक मुंढे पाटील, गोलू महातो संदीप सातपुते,हर्षीत खत्री, तुषार चंदवानी,दिप वर्मा, संकेत सुराणा, पंकज सरकटे,मंगेश पिंगळे,पियुष अग्रवाल, निकेतन यादव, कार्तीक अर्ज, ऋषिकेश माहुरकर, भूषण पारिक व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.

Related posts

नगरपालिकेच्या तक्रारी वरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

बारादरी भागात पाणपोईचे उद्घाटन

nirbhid swarajya

व्हाट्सएपच्या माध्यमातून लग्न लावून देण्याचं आमिष इंदोरच्या तरुणाला महागात

nirbhid swarajya
error: Content is protected !!