April 19, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ व्यापारी

राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. 13 मधील रस्त्या संदर्भात निवेदन..

खामगांव:छत्रपती शिवाजी महाराज नगर भागातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये डॉ. कुहाटे ते विशाल भवर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण व पेवर ब्लॉक बसविणे या कामाचे वर्क ऑर्डर निघाली होती. परंतु ठेकेदाराने त्या ठिकाणी फकत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु अगोदर रस्ता डांबरीकरण करून नंतर पेव्हर ब्लॉक बसविणे अपेक्षित होते. पण ठेकेदाराने अगोदर पेव्हर ब्लॉक बसविले आहे व रस्त्याचे डांबरीकरण अद्याप पर्यंत केले नाही.व कामाचे जवळ पास 75 ते 80% बिल काढले आहे तरी आपण या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच सदर रस्ता त्वरित डांबरीकरण करून रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक काढून नवीन बसविण्यात यावे या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद खामगाव यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष देवेंद्र दादा देशमुख, मा. नगरसेवक महेंद्र पाठक, युवक जिल्हा सरचिटणीस तथा दक्षता समिती सदस्य आकाश खरपाडे, युवक शहर अध्यक्ष, मिर्झा अक्रम बेग, रुपेश शर्मा, सागर बेटवाल, सागर मोरे, गणेश नेमाने, शांताराम सोले, योगेश घनोकार, शे. सादिक, अतुल खिरोडकार, पवन भगत, गणेश फुटकुळे व भागातील नागरिकांची उपस्थिती होती.

Related posts

सरकारने तात्काळ प्रायव्हेट हॉस्पिटल ताब्यात घ्या- अशोक सोनोने

nirbhid swarajya

शिवजयंती महाराष्ट्रात ३६५ दिवस साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

nirbhid swarajya

अवैध दारू विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई; एका आरोपीस अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!