January 4, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

लाडक्या बाप्पांना खामगावात श्रध्देचा निरोप!

खामगावात चोख पोलीस बंदोबस्त: श्रींच्या विसर्जनाला शांततेत सुरूवात

खामगाव : इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २८ श्री गणेश मंडळांनी सहभाग दिला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा लाकडी गणपती निघाल्यानंतर सकाळी … वाजता सुरूवात झाली. तत्पूर्वीच भाविकांनी घरगुती गणेश मंडळाचे भक्तीमय वातावरण विसर्जन केले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.कोरोना विषाणू संक्रमणानंतर यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात श्रींचा उत्सव साजरा झाला. ‘रिकामं झालं घर…रिता झाला मखर…पुढल्यावर्षी लवकर येण्यास निघाला आमचा लंबोदर’, ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’,अशा जयघोषात बाप्पांला आबालवृध्द भाविकांनी श्रध्देचा निरोप दिला.फरशी येथून गुरूवारी सकाळी ९ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. खामगाव येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत २८ गणेश मंडळं सहभागी झाले. सकाळी ९:५० वाजता खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर यांनी फरशी चौकात मानाच्या गणेशाचे पूजन केले. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भाजप शहराध्यक्ष शेखर पुरोहित यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग दिला. मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिसºयास्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर मिरवणुकीत सहभागी विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी विविध गणेश मंडळाच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये हनुमान मंडळाच्या खेळाडूंनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी १ वाजता मानाचा लाकडी गणपती मस्तान चौकातून पुढे निघाला.या मिरवणुकीदरम्यान शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

गणेश विजर्सनासाठी तगडा बंदोबस्त

खामगावातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस उपायुक्त तथा तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांना खामगावात पाचारण करण्यात आले आहे. तिन्ही अधिकारी खामगावात दाखल झाले असून गुरूवारी रात्रीच पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी विसर्जन मार्गाची पाहणी केली.

खामगाव गणेश विसर्जन रात्री 8 पर्यंत 9 मंडळ मस्तान चौक पास…..

गणेश विसर्जन मिरवणुकीत 8 वाजेपर्यंत मस्तान चौक भागातून लाकडी गणपती, तानाजी व्यायाम मंडळ, हनुमान व्यायाम मंडळ राणा मंडळ ,जय भवानी मंडल चांदमारी, राष्ट्रीय मंडळ,जगदंबा मंडल बालापुर फैल (मुरेकर) मंडळ ,जय संतोषी मां मंडळ , तेलगुराज मंडळ मस्तान चौकमधुन पास झाले.असे एकून 9 मंडळ 8 वाजे पर्यत पास झाले.पुढ़ील मंडळ नंबर नुसार मिरवणुक सुरू आहे.

Related posts

शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना पोलीस महासंचालक यांचे पदक जाहीर

nirbhid swarajya

अग्रसेन चौकात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खून

nirbhid swarajya

कोरोना योद्धाचा पारिवारिक सत्कार

nirbhid swarajya
error: Content is protected !!