November 20, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

माँ जिजाऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाडी तर्फे शिक्षक दिनी वाडी परिसरातील सर्व शिक्षकांचा केला सन्मान …

खामगाव:सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असलेले वाडी येथील मा जिजाऊ सांस्कृतिक बहुउद्देशीय क्रीडा मंडळाने देशाची भावी पिढी तयार करण्याचे तसे एक आदर्श समाज निर्माण करण्याचे महन कार्य करीत असतात म्हणून त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे म्हणून मा आ राणा दिलीप कुमारजी सानंदा यांच्या मार्गदर्शनाने व मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी

गणेशोत्सवानिमित्त तसेच देशाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाडी परिसरातील संपूर्ण शिक्षकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे आगळावेगळा या कार्यक्रमाला भव्य स्वरूप येऊन या कार्यक्रमांमध्ये एकूण ६९ पुरुष महिला शिक्षकांचा सन्मान मंडळांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला आहे या अतिशय चांगल्या उपक्रमा च्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वाडी परिसरातील जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक जानरावजी देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमाताई ठाकरे ह्या होत्या तर गुरुदेव सेवा मंडळाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक पंजाबरावजी देशमुख त्याचप्रमाणे डिझायर कोचिंग क्लासेसचे संचालक दांडगे सर गुंजकर कोचिंग क्लासेस गोंदकर सर त्याचप्रमाणे सरपंच तालुका संघटनेचे अध्यक्ष गणेश जी ताठे समाजसेवक अनंता रामोळे व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाडी गावाचे सरपंच विनोद जी मिरगे सचिव निखिल देशमुख गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच उपसरपंच विजय बोर्डे ग्रामपंचायत सदस्य सौ डांबरे सौ तांगडे सौ कोलते अजय खोदरे शिवा सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते

सुरुवातीला मा जिजाऊ सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या या चांगल्या उपक्रमाची कौतुक करून मंडळाचे आभार व्यक्त केले यावेळी प्रमुख वक्ते पंजाबराव जी देशमुख गुंजकर सर दांडगे सर इंगळे सर अनंता धामोळे यांनी मौलिक असे मार्गदर्शन करून या उपक्रमाबद्दल मंडळाचे कौतुक केले तर सूत्रसंचालन संभाजीराव टाले यांनी केले यावेळी वाडी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते

Related posts

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विद्यार्थी स्वयंप्रशासन व शिक्षकदिन साजरा…

nirbhid swarajya

क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी जळगावात चमकले

nirbhid swarajya

Fitness | How To Start (Or Get Back Into) Running

admin
error: Content is protected !!