खामगाव:आपल्या भावासोबत लपवा -छपवी खेळत असताना गळफास लागून १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदय वाचक घटना, खामगावच्या समर्थ नगरात काल २९ ऑगस्ट रोजी घडली.प्रणित दिलीप इंगळे वय वर्षी १२ रा समर्थ नगर खामगाव असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. प्रणित त्याच्या भावासोबत दुपारी २ च्या दरम्यान घरात लपवा-छपवी खेळत होता. लपण्यासाठी तो बाथरुममध्ये गेला होता. बाथरुममध्ये प्रणित चा अचानक पाय घसरून त्याची मान बाथरूममध्ये लटकलेल्या ओढणीत अडकली. घरातील लोकांना कळताच त्यांनी प्रणितला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी प्रणित याची तपासणी करून मृत घोषित केले.
