November 20, 2025
अकोला आरोग्य खामगाव गुन्हेगारी चिखली जळगांव जामोद जिल्हा शेगांव

शेगाव अळसना रोडवरील श्रद्धा रेस्टॉरंट वर डीबी पथकाचा छापा विदेशी दारू जप्त

शेगाव :- शेगाव शहर पोलीस स्टेशनचे बीबी पथक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने शेगाव आळसणा रोडवर असलेल्या श्रद्धा रेस्टॉरंट वर 18 ऑगस्ट रोजी छापा मारून विदेशी दारू जप्त केली याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखा डीबी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन इंगोले साहेब हे आपले सहकारी पोलीस हवालदार गजानन वाघमारे पोलीस नायक राहुल पांडे गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे प्रकाश गवांदे यांच्यासह 18 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की पळसना रोडवरील सरदार रेस्टॉरंट मध्ये अजय नानाराव मोरखडे वय 38 वर्ष राहणार भोनगाव तालुका शेगाव व प्रभाकर शंकर पहुरकर वय 45 वर्ष राहणार मुरारका कॉलेज समोर शेगाव हे दोघेजण विदेशी दारूची विक्री करीत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून उपरोक्त ठिकाणी डीबी पथकाने छापा मारला असता विदेशी कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या 10 शीशा किंमत 1420 रुपयांची विक्री करीत असताना उपलब्ध दोघे आरोपी मिळून आले सदरची कारवाई पोलीस स्टेशन शेगाव शहर चे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार, गजानन वाघमारे करीत आहेत

Related posts

खामगावातील जिनींगविरुध्द एफ.आय आर दाखल करा – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

अवैध पने सालई गोंधने भरलेल्या चारचाकी वाहन पकडले अकोट वन्यजीव विभागाची कार्यवाही…

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 338 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 138 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!