January 4, 2025
क्रीडा खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ सामाजिक

आज गोविंदा दहीहंडी फोडणार…

खामगाव: दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे.जन्माष्टमीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येतो. दहीहंडीच्यावेळी तरुण एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात.खामगाव च्या प्रत्येक प्रभागातून विविध मंडळे या उत्सवादरम्यान उंचावर दह्याने भरलेली हंडी( छोट्या आकाराचे मडके) लावले जाते.ही हंडी तरुणांची विविध मंडळे फोडण्याचा प्रयत्न करतात. जन्माष्टमी जशी जवळ येते तसे तरूण दहीहंडी फोडण्याचा सराव करतात. हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्यात बक्षिसही दिले जाते.आज शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल.बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत.या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.दहीहंडीची प्रक्रिया अत्यंत मजोशीर असते.श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी याचे आयोजन केले जाते.या दिवशी मातीच्या मडक्यात दही, लोणी, मिठाई, फळे इत्यादी भरुन एका उंच ठिकाणी हे मडके टांगले जाते.याला फोडण्यासाठी विविध तरुण मंडळी प्रयत्न करतात.दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा.तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो.हंडी फोडणाऱ्या मंडळांना विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात येते.खामगावत गोविंदांसह गोपिकाही या उत्सवात सहभागी होतात.अनेक मंडळे अशी आहेत,ज्यात केवळ मुलीच आहेत. या मुली मुलांप्रमाणेच धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात.या उत्सवात सेलिब्रिटी देखील हजेरी लावतात आणि अनेक मोठी मंडळी या उपक्रमात सहभागी होत तरूणांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवतात.गेले दोन वर्ष करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी उत्साहात साजरी केली जात नव्हती. परंतु यंदा हा उत्साह द्विगुणीत होणार आहे.दहीहंडी फोडायला सर्व युवा सज्ज झाले आहे. तेव्हा उद्या हा उत्साह पाहूया आणि कुणाला दुखापत होणार नाही याची काळजीही घेऊया.

Related posts

खामगाव तालुक्यातील ग्रामपंचायत इंटरनेटद्वारे जोडण्यासाठी “भारत नेट” चा कारभार चालतो फक्त व्हाट्सअप वरच…

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये वीज ही लॉकडाऊन!

nirbhid swarajya

सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन करा नाईक कृषी विद्यापीठाचे आवाहन..

nirbhid swarajya
error: Content is protected !!