November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी चिखली जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेगांव

६० लाखाची दारूसह ७६, २१ हजाराचा मुद्दे माल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कार्यवाही…

पशुखाद्याच्या नावाखाली घेऊन जात होते दारूचे बॉक्स….

खामगाव: मुंबई भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही बुलडाणा ते खामगाव दारू घेवून जाणारा ट्रक मोठया शिताफीने पाठलाग करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली मोठी कार्यवाही ट्रक हा नॅशनल हायवे नं ६ टेंभुर्णा जवळ पकडण्यात आला असून सदर ट्रकमधून ६० लाख रु.किंमतीचे दारुचे तब्बल ८०० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून ट्रकसह असा एकूण ७६,२१असा दारूसाठा जमा करण्यात आला आहे.मध्यप्रदेशातून एक ट्रक मोठ्या प्रमाणावर दारू घेवून नागपूरकडे जात आहे,अशी गुप्त माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.यावरुन मुंबई भरारी पथकाने बुलडाणा व खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेवून संयुक्त पथक तयार केले.पथकाने काल मध्यरात्री २ वाजेदरम्यान पाठलाग करून ट्रक क्रमांक.सीजी ०७ एव्ही ४४७६ ला टेंभूर्णानजीक पकडले.यावेळी ट्रकची झाडाझडती घेतली असता मागे गेटवर काही कट्टे पशु खाद्य ठेवले होते.तर त्यामागे दारुचे बॉक्स लपविण्यात आलेले होते.यावेळी सदर ट्रक जम करून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आणण्यात आला.दरम्यान आज सकाळी सदर ट्रकमधील दारूसाठा बाहेर काढण्यात आला असता त्यात तब्बल ८०० बॉक्स दारू मिळून आली.याप्रकरणी अटकेत असलेला ट्रकचालक मोहम्मद हनीफ वय वर्षे ५८ याच्या विरुध्द वृत्त लिहेपर्यंत पुढील कारवाई सुरु होती.ही दारु नेमकी कोठून आली आणि कोठे नेण्यात येणार होती याचा तपास सुरु असून अवैध दारु विक्रीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related posts

घरासमोरुन बकऱ्या गेल्या चोरी

nirbhid swarajya

आ.अँड.आकाश फुंडकर यांनी शीख बांधवांना दिल्या प्रकाशपर्वच्या शुभेच्छा

nirbhid swarajya

अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!