November 20, 2025
खामगाव जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेगांव संग्रामपूर

गुरू रविदास चर्मकार महासंघा ची बैठक संपन्न

शेगाव,संग्रामपूर येथील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शेगांव:“गुरू रविदास चर्मकार महासंघा” चे संघटन कसे मजबूत होईल असा प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रयत्न करावा, तसेच समाजातील नागरिकांवर अन्याय अत्याचार झाले तर त्यांना कसा न्याय देता येईल या करिता देखील संघटने च्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अग्रेसर राहावे, मी नेहमी तुमच्या सोबत आहे, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे यांनी बैठकी दरम्यान दिला.”गुरू रविदास चर्मकार महासंघ” बुलढाणा जिल्हा कार्यकारीणी बैठक शेगाव येथे विश्राम भवन दि.7 ऑगस्ट रोजी पार पडली यावेळी ते बोलत होते. बुलढाणा घाटाखालील शेगाव,संग्रामपूर,जळगाव जामोद तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये महेश शेगोकार सर यांची अमरावती विभागीय अध्यक्ष पदी तर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी,प्रकाश शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्ष पदी गजानन शेगोकार,संजय माठे जिल्हासचिवपदी नारायण शेगोकार,शेगाव तालुका अध्यक्ष सूरज घोपे,उपाध्यक्ष गणेश शेगोकार, संदीप सुपोकर,संतोष वानखडे,सचिव प्रल्हाद गव्हाळे,संपर्क प्रमुख पदी लक्ष्मण चिम तर शेगाव महिला तालुका अध्यक्ष पदी श्रीमती पुष्पाताई घाटे,महिला शहर अध्यक्ष पदी सौ.विजया मानकर,तसेच शेगाव शहर अध्यक्ष महादेव डाखोडे,शहर उपाध्यक्ष बाळकृष्ण चिमनकर, शहर उपाध्यक्ष भरत दास,युवा तालुका अध्यक्ष रजन शेगोकार,युवा शहर अध्यक्ष नागेश कळस्कार,युवा शहर उपाध्यक्ष विजय पानझाडे,गटई कामगार जिल्हाध्यक्ष प्रकाश माधवे,शहर अध्यक्ष राजेश वैरभैया,शहर उपाध्यक्ष बाळू पसरटे, तर संग्रामपूर तालुका अध्यक्ष मंगेश वानेरे,या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी प्रदेश अध्यक्ष राज कुमार नाचणे,कार्याध्यक्ष काशीराम डांगे,उपाध्यक्ष उत्तम घोपे,महासचिव अँड शेषराव गव्हाळे,सह सचिव दादाराव वानखडे, प्रवक्ता प्रशांतभाऊ भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रदेश अध्यक्ष राजकुमार नाचणे ,व अँड शेषराव गव्हाळे,काशीराम डांगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,सुत्रसंचालन प्रशांतभाऊ भटकर तर आभार प्रदर्शन प्रकाशभाऊ शेगोकार यांनी केले यावेळी चर्मकार समाजासह “गुरू रविदास महासंघाचे” पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती बुलढाणा जिल्हा मीडिया प्रमुख गणेश पानझाडे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली आहे.

Related posts

सागर पवार यांची पुणे जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीडिया सेल प्रमुख पदी निवड

nirbhid swarajya

Barely Into Beta, Sansar Is Already Making Social VR Look Good

admin

खामगांव मधे मानाच्या लाकडी गणपतीची साध्या पद्धतीत स्थापना

nirbhid swarajya
error: Content is protected !!