April 19, 2025
खामगाव बातम्या बुलडाणा महाराष्ट्र राजकीय विदर्भ शेगांव संग्रामपूर सामाजिक

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता!शेत रस्ता झाला मोकळा

संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील तामगांव शिवारातील जाण्या येण्याचा बारीवाटीचा रस्तात लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आल्यामुळे गट नं. 25 शेताची कामे तसेच ईतर दळणवळण कामे करण्यासाठी जाता येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली असता अनुषंगाने संग्रामपूर तहसील कार्यलय समोर तामगाव ग्रामस्थ यांनी दि.१रोजी पासून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू केले होते. त्याची मागणी तबल चौथ्या दिवशी पूर्ण झाली असल्याने सदर उपोषणाची सांगता करण्यात आली आहे,तामगांव शिवारातील गट नं. 25.24 23जाण्या येण्याचा बारीवाटीचा रस्तात गावातील एका नागरिकाने लोखंडी अँगल लावून सदर रस्ता बंद करण्यात आल्यामुळे गट नं.25 शेताची किस्तकारी तसेच ईतर कामे करण्यासाठी जाता येत नसल्याने तसेच गट 23-24 मध्ये अकृषक प्लॉट पडलेले असून गांवातील बऱ्याच नागरिकांनी त्या ठिकाणी घरे बांधून राहत आहेत.गत आठवड्या पर्यत सदर चालु होता परंतु रस्तात लोखंडी अँगल लावून बंद करण्यात आल्यामुळे जाण्या येण्याचा रस्ताच उपलब्ध राहीला नाही. या बाबत ग्रामपंचायत यांना देखील कळविण्यात आले मात्र सदरचा रस्ता मोकळा करुण देण्यास असमर्थ असल्यामुळे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात येऊन समस्यां सोडविण्या यावी अशी मागणी केली होती व उपोषणाचा ईशारा देण्यात आला होता. मात्र समस्या दूर झाली नसल्याने दि १ ऑगस्ट रोजी पासून तामगाव ग्रामस्थ यांनी तहसील कार्यलय समोर आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषण कर्त्यांची राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मंडळींनी भेटी दिल्या होत्या मात्र चौथ्या दिवशी दि ४ रोजी सायंकाळी तामगाव ग्रामपंचायत सरपंच व सचिव याचे लेखी पत्रात कळविले की सदर रस्ता मोकळा करण्यात आला आहे उपोषण कर्ते यांना तहसीलदार वरणगावकर यांच्या हस्ते लेखी पत्र देण्यात येऊन उपोषण कर्त्यांची मागणी पूर्ण करत उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी तहसीलदार वरणगावकर,नायब तहसीलदार विजय चव्हाण, तलाठी विनोद भिसे,तामगाव ग्रामस्थ अनिल घिवे,सुभाष पारस्कर,रामधन घिवे,कैलास कडाळे पाटील,भय्या घिवे,यांच्या सह उपोषण कर्ते व तामगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक व तालुक्यातील राजकीय नेते मंडळी यांची उपस्थिती होती.

Related posts

नवीन ठाणेदारांना श्री “गणेश” ची जवळीक आणणार गोत्यात ?

nirbhid swarajya

शिधा पत्रिकेतून गव्हाचे वाटप वगळण्याचा प्रयत्न करू नये – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

10 लाख किंमतीचा 1 किंटल गांजा पकडला….

nirbhid swarajya
error: Content is protected !!