January 7, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय

आजादी गौरव पदयात्रा निमित्त १० ऑगस्ट ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्ह्यात

काँग्रेसच्या सर्व आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे:धनंजय देशमुख

खामगाव:अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याचा ७५वा अमृतमहोत्सवानिमित्त आणि ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ कि मी आजादी गौरव पदयात्रा निघणार आहे याचा शुभारंभ विदर्भातील वर्धा येथून प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार असून त्याचा समारोप १४ ऑगस्ट रोजी पुणे येथे होईल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजादी गौरव पदयात्रे करिता ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री नाना पटोले बुलडाणा जिल्ह्यात येणार असून १० ऑगस्ट च्या पदयात्रेत प्रदेशअध्यक्ष श्री नाना पटोले प्रमुख उपस्थितीत निघणार आहे ह्या पदयात्रेच्या दौरा पूर्वतयारी करिता महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष श्री शरद अहेर,प्रदेश सरचिटणीस तथा सोशल मीडिया प्रमुख श्री विशाल मुत्तेमवार,काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस श्री शाह आलम,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव तथा दौरा समन्वयक धनंजय देशमुख , नेत्यांवर दौर्‍याच्या पूर्वतयारी तसेच नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे ह्या पदयात्रेकरिता महाराष्ट्र प्रदेशच्या काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे

Related posts

क्वारंटाईन सेंटर मधून संशयित आरोपी रुग्ण पळाला….

nirbhid swarajya

वादळी वाऱ्यामुळे शेगांव तालुक्यातील गव्हाण येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

nirbhid swarajya

वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी जाहीर

nirbhid swarajya
error: Content is protected !!