संग्रामपूर प्रतिनिधी :- कालच देशाच्या सर्वोच्च पदी एका आदिवासी महिलेने सूत्र हाती घेतली देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिलेला विराजमान होण्याचा बहुमान मिळाला खरं पण देशातील आदिवासी समाजातील मुलांना अजूनही कशा प्रकारे शिक्षण मिळत आहे याच भीषण वास्तव बुलढाना जिल्ह्यातील आदिवासी तालुका असलेल्या संग्रामपूर मधील शिवणी गावात समोर आला.शाळेवर शिक्षक नेमणूक असूनही शाळेत शिक्षक येतच नसल्याने संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी भागातील शाळा गेल्या अनेक दिवसांपासून कुलूपबंद असल्याने या भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झाल्याच भीषण वास्तव समोर आले , दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद होत्या , आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षण नव्हतेच , आणि आता शाळा सुरू होऊन जेमतेम एक महिनाच झालाय पण तालुक्यातील आदिवासी भागातील शाळेत शिक्षकांची नेमणूक असूनही शिक्षक शाळेत येतच नसल्याने या विद्यार्थ्यांचं भविष्य काय..? असा सवाल या भागातील आदिवासी करत विध्यार्थ्यानी आपल्या पालकासोबत शाळेसमोरच ठिय्या दिला आहे , राजकारणी आपल्या राजकारणात आहेत , राज्याला शिक्षण मंत्री नाही.त्यामुळे कदाचित प्रशासन अनेकदा तक्रारीं करूनही या आदिवासींच्या समस्याच एकूण घेत नसल्याने आता या विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू करावं लागलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हे भयानक वास्तव संग्रामपूर तालुक्यातील शिवणी गावातील आहे.
रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात. .
तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे एकूण 83 पदे रिक्त असून शिक्षण विभाग कुचकामी झाल्यामुळे कोणताही पाठपुरावा संग्रामपूर प स व शिक्षण विभागाने न केल्यामुळे मागील 10 वर्षांपासून 83 पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे.
