संग्रामपूर प्रतिनिधी :- बुलडाणा जिल्ह्यातील संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा व ऍग्रोविजन मधून मार्गदर्शन साठी आपला अमूल्य वेळ देण्यात यावी असे निवेदन भाजप बुलढाणा जिल्हा सचिव श्याम अकोटकार व दत्ता पाटील बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष भाजप यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी याना दिले आहे अपेडा व ऍग्रिव्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आउटरिच प्रोग्राम विदर्भातील कृषी उत्पादने,फळ,आणि भाजीपाला निर्यातीची संधी चा कार्यक्रम नागपुर येथे दि 17जुलै रोजी आयोजित केला असता त्या मध्ये संग्रामपूर तालुक्यातील ऍग्रोविजन चे सदस्य श्याम अकोटकार यांनी नितीन गडकरी याना निवेदन दिले त्या मध्ये नमूद होते की आमच्या संग्रामपूर तालुक्यात संत्रा हे पीक 3500 हेक्टर तसेच केळी पीक 1500 हेकटर एवढ्या क्षेत्रफळावर घेतल्या जात असून या दोनीही पिकाला निर्यात कशी करायची या करिता मार्गदर्शन पहिजे म्हणून आपण आपला अमुल्य वेळ देऊन अपेडा व ऍग्रोविजन यांच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आपल्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करायचे आहे या मेळाव्यातूंन आपले संत्रा व केळी उत्पादक शेतकऱयांना योग्य मार्गदर्शन लाभेल.