January 1, 2025
अकोला अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दोन देशी बनावटीचे पिस्टल जप्त. चारआरोपी अटकेत,लाखोचा मुद्देमाल जप्त….

जळगाव जामोद(कृष्णा जवंजाळ)पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या बऱ्हाणपूर रोडवरील निमखेडी फाटा नजीक दिनांक १६ जुन रोजी संध्याकाळी पाच वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना एक संशयास्पद लाल रंगाची तवेरा गाडी येताना दिसली गाडीला थांबवून तिची तपासणी केली असता गाडीमध्ये परशुराम रमेश करवले २३ राहणार सोमवार पेठ कराड जिल्हा सातारा तर दुसरा आरोपी अभिजीत दिलीप येडगे वय १९ राहणार अहिल्यानगर मलकापूर तालुका कराड,दिनेश विजय बुरुंगले वय २२ वर्ष राहणार सातारा, तर चौथा आरोपी कुणाल बाबुराव हिवरे वय 23 राहणार रेहटे तालुका कराड जिल्हा सातारा हे चार आरोपी मिळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्टल व चार मोबाईल यासह तवेरा गाडी एम एच ११ ए एल९५९४ असा एकूण सहा लाख पंधराशे रुपये चा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासाकरिता आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस त्यांची कस्टडी ची मागणी करणार आहेत. याच तपासकामी सातारा जिल्हा एलसीबी चे पथक जळगाव जामोद येथे आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ठाणेदार सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील वावगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पुंडे, उमेश शेगोकार,  सचिन राजपूत, प्रशांत डांमरे यांनी ही कारवाई केलेली आहे. सदर हे आरोपी बुऱ्हाणपूर येथून देशी कट्टे घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये काही कटकारस्थान रचतात तर नाही ना? असा प्रश्न येथील एलसीबी पथकाला पडला असावा त्यामुळेच जळगाव जामोद येथे हे पथक दाखल झाले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात त्यांच्या या कारवाईची कौतुक होत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 193 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

Fashion | ‘Ironic Pink’ And 4 Other Back-To-School Trends

admin

जिल्हयात आज प्राप्त १७ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!