January 4, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा विदर्भ

पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

खामगाव:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर येथील पाण्याच्या टाकी जवळ आंदोलन केले यामध्ये गावकऱ्याला पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले कित्येक दिवसांपासून शहापूर या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे परंतु सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिला त्रस्त आहेत त्यामुळे संबंधित विभागाने येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्याम अवथळे खामगाव तालुका अध्यक्ष अतिक पळसकार यांनी आंदोलन केले यावेळी पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता व ग्रामपंचायत सचिव यांच्याकडून लेखी आश्वासन दिल्या मुळे आंदोलनाची तात्पुरते स्थगित करण्यात आले कित्येक वेळा निवेदने देऊन सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी उपाय योजना करण्यात येत नसल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली गेल्या कित्येक वर्षांपासून शहापुर येथे मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा पेयजल योजनेअंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली व प्रत्यक्ष कामाला सन २०१८-१९ ला सुरुवात होउन सन २०१९ -२० ला पूर्ण झाल्याचे संबंधित विभागाने जाहीर केले . सदरची योजना ग्रामपंचायतने ताब्यात घ्यावी . या संबंधी ग्रामपंचायतला कळविले . परंतु योजनेच्या मुळ निकषाप्रमाणे गावातील उंच घरापर्यंत पाणी पोहोचविणे असे योजनेच्या प्रख्यात आहे . परंतु गावातील सखल भागात सुध्दा प्रत्यक्ष पाणी सोडुन बघितल्यानंतर पाणी पोहोचत नाही असे दिसुन येते , बरेच ठिकाणी व्हॉल्य नाही , पाईप लाईनची गुणवत्ता योग्य नसल्याने अनेक ठिकाणी गळती होत असल्याचे आढळून आले . त्यामुळे सदर योजना ग्रामपंचायत ताब्यात घेण्यास तयार नाही संबंधित विभाग दुरुस्त्या करण्यास तयार नाही . त्यामुळे गावक – यांचे पाण्यावाचुन हाल होत आहेत . गावातील विहिरीत अतिरिक्त क्षार असल्यामुळे गावात किडणीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत . ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग यांच्या अडेलतट्टु भुमिकेमुळे सदरची योजना वादात अडकली आहे .असे निवेदन गट विकास अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी यांना देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले यावेळी चरणराज तिडके रामकृष्ण चतरकार, ग्रामपंचायत सदस्य जीवन भुसारी, गजानन तिडके दिनेश तिडके गजानन गवळी रामकृष्ण कराळे गोलू वैराळे गोपाल बदरखे दशरथ खंडारे चंदन मेतकर दत्ता पडोळ शिवा गवळी संतोष वाडेकर अमोल फेरंग उपस्थित होते

Related posts

अरविंद शिंगाडे यांच्या ‘सूत्रसंचालनाची सूत्रे’ चे प्रकाशन.

nirbhid swarajya

आज जिल्ह्यात प्राप्त 148 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 10 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

उमेदच्या महिलांचा गावागावात एल्गार

nirbhid swarajya
error: Content is protected !!