April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी बातम्या बुलडाणा

जनुना तलावात युवकाची आत्महत्या,आत्महत्येचे गुढ कायम..?

खामगाव:शहरालागत असलेल्या जनुना तलावात आज १६ जून रोजी एका तरुण युवकाने तलावात उडी मारून आत्यहत्या केली सदर युवक योगेश देविदास चोपडे वय ३४ हा खामगाव शहरातील फरशी सुतार परिसरात राहणारा असून,त्याने सकळी जनूना तलावात उडी मारून आत्महत्या केली.तलावात उडी मारतांना त्याला परिसरातील काही नागरिकांनी पाहिले आणि आरडा ओरड केला..काही नागरीक त्याला वाचवण्यासाठी तलावाच्या काठाकडे धावून गेले.मात्र त्याला वाचवण्यासाठी गेलेले नागरिक पोहचेपर्यन्त त्या युवकाचा पाण्यातबुडून मृत्यू झाला होता.तलावाच्या काठवरच त्याच्या चपला व कपडे आढळून आले होते.त्या युवकाने का आत्महत्या का केली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले होते ,सदर युवकाचे प्रेत बाहेर काढण्यात आले असून पोलीसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.सदर युवकाने आत्महत्या का कली याचा तपास पोलीस करित असून अजूनही मृत्युचे गुढ अजूनही कायम आहे.

Related posts

राहुल गांधी श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेणार…

nirbhid swarajya

बुलडाण्यात कोरोना पॉझेटीव्ह मृत रुग्णाच्या परिसरामध्ये शासनाचा रेड अलर्ट

nirbhid swarajya

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर किसान बाग आंदोलन

nirbhid swarajya
error: Content is protected !!