November 20, 2025
आरोग्य खामगाव बातम्या बुलडाणा शिक्षण

खामगाव येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा

सागरदादा फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण

खामगाव :प्रत्येक माणसांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करणे आणि प्रत्येकाने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे या उद्देशाने दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो.खामगाव येथील अंत्रजमधील एन के ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फुंडकर यांनी पुढाकार घेत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला.प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपणास सहकार्य केल्यास वाढते कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण काही प्रमाणात कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. मागे कोरोना काळात ऑक्सीजनसाठी धावपळ होताना आपण पाहिली आहे.ऑक्सिजन अभावी असे हाल होत असतानाही विकासाच्या नावावर आपण आपणास फुकट ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांचा खुलेआम कुऱ्हाड चालवून बळी घेत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी एकतरी वृक्ष रोपण करून त्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन करावे असे मत सागरदादा फुंडकर यावेळी त्यांनी व्यक्त केले.यावेळी तेथे प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रसार अभियानाचे विदर्भ प्रांत संयोजक डॉ. संतोष मिश्रा,प्रधानमंत्री जनकल्याण प्रसार अभियान योजना अध्यक्ष आशिष सुरेका,खामगाव सामाजिक कार्यकर्ता विनोद तिवारी,प्रधानमंत्री जनकल्याण प्रचार अभियानाचे जिल्हा सचिव रवींद्र टाके,एन के ज्युनिअर कॉलेजचे सर्वेसर्वा तसेच प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेचे जिल्हाध्यक्ष नरेश नागवानी, साईलिला ग्रामीण संस्थेचे सचिव सुनील माळी, एन के ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माणिक भटकर,बुलडाणा जिल्ह्यतील मीडिया प्रभारी दीपक नागराणी, अंत्रज गावचे सरपंच वरखडे आणि अंत्रज गावचे उपसरपंच कैलास भाऊ आदि उपस्थित होते.

Related posts

खामगावातील जिनींगविरुध्द एफ.आय आर दाखल करा – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 361 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 103 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

अन् ओसाड भिंती झाल्या बोलक्या….!

nirbhid swarajya
error: Content is protected !!