April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी

काळ्या बाजारात विक्री करिता साठवून ठेवलेला तांदूळ जप्त…

पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांची धाडसी कारवाई…

नांदुरा: गुप्त माहितीच्या आधारे साठवलेला तांदूळ अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पडकला मिळालेल्या माहितीनुसार अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरा येथे बालाजी नगरात राहणारे पांडुरंग लांडे यांचेघरी धाड टाकली असता, त्यांच्या प्लॉट मधील टिन शेड मध्ये शासकीय स्वस्त धान्य वितरण प्रणालीचा 175 क्वींटल तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला आढळला.अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे आदेशा प्रमाणे पो.उ.नि.पंकज सपकाळे, पो.हे.का.गजानन बोरसे, ना. पो.का. गजानन आहेर,रघु जाधव, संदिप टकसाल,पो. का. राम धामोड़े दोन शासकीय पंच ,पुरवठा अधिकारी यांनी बालाजी प्लॉट मध्ये जाऊन पाहणी केली असता पांडुरंग लांडे यांच्या प्लॉट मधील टिनशेड मध्ये तांदूळाने भरलेल्या 50 किलो वजणाच्या 350 बँग आढळल्या.175 क्वींटल असलेला हा तांदुळ एकूण 6,51,000/- रु किमतीचा असून 7000 रुपये किमतीचे दोन काटे असा एकूण 6,58000/- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर तांदूळ व मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाही साठी पुरवठा अधिकारी नांदुरा यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात , अपर पोलीस अधीक्षक खामगांव यांचे आदेशाने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केली. शेवटी नांदुरा महसूल प्रशासनाकडून तांदुळ माफियांवर काय कारवाई केल्या जाते याकडे मात्र संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.असे असले तरी,बुलडाणा जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नसल्याने सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार कोलमडला असल्याचे नागरिक चर्चा करत आहे

Related posts

शेगाव येथे अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी

nirbhid swarajya

कृउबास श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने आपत्तीग्रस्त कामगारांना ४० हजाराची मदत

nirbhid swarajya

जनतेचा आग्रह असल्यास लोकसभा लढवणार – संदीप शेळके

nirbhid swarajya
error: Content is protected !!