January 4, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय सामाजिक

सामूहिक विवाह सोहळ्यात माझ्या असंख्य मुलींना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे – अशोकभाऊ सोनोने

कोविडच्या काळात मुलीच्या लग्नात हजारो हाथ आशीर्वाद देण्यासाठी बोलवू शकलो नाही!

खामगाव:गेली २ वर्ष कोविडमुळे जनजीवन विस्कळित झाले होते. याचा खोलवर परिणाम सामाजिक जीवन जगत असताना तुम्हा-आम्हा सर्वांना भोगावा लागला. मानवी जीवनात लग्न समारंभ हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण, पण तरी सुद्धा कोविडची लाट कमी झाल्यावर जवळपास एक वर्ष शासनाच्या नियम अटी नुसार ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावा लागला. आणि याचा फटका देशातील बहुसंख्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बड्या लोकांना तसेच सर्वसामान्यांना बसला.महाराष्ट्रात आणि बुलडाणा जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात असंच एक तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असलेलं मोठ आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनोने … यांची धाकटी कन्या डॉ. मोनाली हीचा विवाह सुध्दा कोविडच्या शिथिल काळात कोर्ट मॅरेज नुसार अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ५० लोकांच्या उपस्थितीत डॉ. रोहन सावंत यांच्या सोबत मुंबई येथे पार पाडावा लागला. याच कारणांमुळे आपल्या मुलीच्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी हजारो हाथ दूर राहिले कुणाला बोलवता आले नाही ही खंत अशोकभाऊ सोनोने यांच्या मनात सतत होती.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे अशोकभाऊ सोनोने यांनी अखेर जे मुलीच्या लग्नात आपण करू शकलो नाही मात्र सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील -मुलींचं लग्न लावून ते आशीर्वाद त्याच्या रूपाने घ्यावे तसेच ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी सप्ताह साजरा करण्यात येतो या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून येत्या ८ मे रोजी या सामूहिक विवाह सोहळ्याचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. आणि यातून पुन्हा एकदा सामाजिक दायित्वाची एक छोटीशी परतफेड माझ्या हातून घडेल असं मत अशोकभाऊ सोनोने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलंय.

कशाप्रकारे आहे विवाह सोहळा
भारतीय बौद्ध महासभा शाखा बुलडाणा जिल्हा उत्तर यांच्या विद्यमाने शाखा खामगाव शहर यांनी श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये स्वाभिमान दिन म्हणून मनवण्यात येतो त्यानिमित्त बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे हा विवाह सोहळा दिनांक ८ मे २०२२ रविवार रोजी सकाळी १०.३० वाजता खामगाव येथील नांदुरा रोडवर असलेल्या श्रीहरी लॉन्स येथे संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्यात एकूण २८ जोडप्यांनी नावांची नोंद केलेली आहे या विवाह सोहळ्याला उद्घाटक म्हणून मा.भिमराव तायडे व मुख्य आयोजक तथा स्वागतोत्सुक अशोक भाऊ सोनोने यांची उपस्थिती आहे प्रमुख उपस्थिती मध्ये एस.एस. वले अध्यक्ष बुलडाणा जिल्हा उत्तर, बी.के. हिवराळे सरचिटणीस बुलडाणा जिल्हा उत्तर,विनेश इंगळे अध्यक्ष खामगाव तालुका, सिताराम तिडके सरचिटणीस खामगाव तालुका, जी.यु.गवई सरचिटणीस खामगाव शहर,रमेश गवारगुर जिल्हा संघटक, जे.के.रणीत जिल्हा संघटक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा,बुलडाणा जिल्हा समता सैनिक दल- सर्व अधिकारी व सैनिक जिल्हा- तालुका -शहर शाखा सर्व पदाधिकारी,व कार्यकर्ते यांनी केले आहे

Related posts

शहर पोलिसांनी दारू घेवून जाणारी पिकअप पकडली

nirbhid swarajya

बनावट विदेशी दारू सह दोघांना अटक १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

nirbhid swarajya

धक्कादायक;पुन्हा एका मुख्याध्यापकाचे कु कृत्य आले समोर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!