April 16, 2025
बातम्या

श्रीं चे मंदिर आजपासुन भाविकांकरिता खुले

शेगांव:- कोरोना प्रतिबंध उठविण्यात आल्यानंतर शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर सर्वच भाविकांसाठी आज दि. १४ एप्रिलपासून दर्शनासाठी खुले होणार आहे.मार्च २०२० मध्ये राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंध घालण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने दि.३१ मार्चपासून कोरोना प्रतिबंध उठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेसुद्धा तसे आदेश निर्गमित केले.शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात कोरोना काळात ई-दर्शन पास घेऊन दर्शन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र राज्य शासनाने निर्बंध मागे घेतल्याने भाविकांना पूर्ववत् दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. दि.१० एप्रिल पर्यंत ई- -पास नोंदणी केलेल्यांनी दर्शनासाठी आगाऊ बुकिंग केली होती. त्यामुळे दहा तारखेपर्यंत ई-पासद्वारेच भाविकांना दर्शन घेता आले. त्यानंतर पूर्ण क्षमतेने दर्शनाची सोय भाविकांना मिळावी म्हणून संस्थानच्या वतीने तयारीसाठी दि ११, १२ आणि १३ एप्रिल रोजी मंदिर बंद ठेवण्यात आले होते

Related posts

रस्ते अपघातात दररोज जखमी व मृत्यु पावणा-यांची संख्या कोरोना महामारी पेक्षा जास्त – श्री.राधेशाम चांडक…

nirbhid swarajya

बुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार?

nirbhid swarajya

अवैध पने सालई गोंधने भरलेल्या चारचाकी वाहन पकडले अकोट वन्यजीव विभागाची कार्यवाही…

nirbhid swarajya
error: Content is protected !!