खामगाव:- तालुक्यातील पिंप्री गवळी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त माळी युवा संघटना पिंप्री गवळी यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून पिंप्री गवळी गावकऱ्यांच्या वतीने गावामधून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महात्मा फुले यांचा जय जयकार करत गावातून मार्गक्रमण करीत कार्यक्रम स्थळी पोहोचली. त्यानंतर मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सरपंच पती राजेंद्र इंगळे, उपसरपंच पती चेतन फुंडकर,बेलदार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बघे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय सुडोकार, ग्रामपंचायत सदस्य अरुण बंड, गजानन सुडोकार ,श्रीकृष्ण इंगळे, विष्णू काळे ,दिगंबर उमाळे, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश बोदडे, दिलीप सिंह ठाकुर, संतोष इंगळे, मुकुंदा बुंदे,महादेव काकडे, गणेश खेडकर, विष्णू सुडोकार यांच्यासह बहुसंख्य माळी समाजातील युवक व गावकरी उपस्थित होते सूत्रसंचालन नयन बंड यांनी केले मनोगत शेषराव हिवराळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन माळी युवा संघटना अध्यक्ष गोपाल इंगळे उपाध्यक्ष अमित बंड व इतर सदस्य यांच्यावतीने करण्यात आले होते.