January 6, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा शेतकरी

एकनाथ दौंड यांची दुग्ध व्यवसायातून समृद्धी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा घेतला लाभ

बुलडाणा:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ चा बोर्ड गावात लावताना बघीतला.अन् पटकन मनात विचार आला. या महामंडळाच्या योजनांचा लाभ आपणाला कधी मिळेल. हा विचार घेवून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयकांना योजनेच्या लाभाबाबत विचारणा करण्यात आली. अण्णासाहेब  पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा समन्वयकांद्वारा विचारणा करणाऱ्या व्यक्तीची व्यवसाय करण्याची इच्छा जाणून घेवून त्यांच्याकडून सर्व अटी व पात्रता पुर्ण करण्यात आल्या. त्यानंतर सदर व्यक्तीला 10 लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. ती व्यक्ती आज दुग्धव्यवसायातून आर्थिक उन्नती साधत आहे. या व्यक्तीचे नाव एकनाथ श्यामराव दौंड असून धाड, ता. जि बुलडाणा येथील रहीवासी आहे.एकनाथ दौंड यांना आधीपासूनच दूग्धव्यवसायाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी सदर योजनेतून शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी 12 होस्टन जर्सीमधील गायी घेतल्या, अन व्यवसाय सुरू केला. आजरोजी त्यांच्याकडे 30 गायी व बरेच छोटे वासरे आहे.  रोज कमीत कमी 500 लीटर दूधाचे उत्पादन घेतले जात आहे. आता दुग्धव्यवसाय हा मुख्यव्यवसाय होवून शेती व्यवसायाला पुरक व्यवसाय बनला आहे. ते आपल्या या यशाचे श्रेय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि चिखली अर्बन को.ऑपरेटीव्ह बॅंकेला देतात. खूप जास्त शिक्षण नसले तरी चालेल.. मातीशी नाळा जुळता आले की घाले. तसेच प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली की…कोणत्याही व्यवसायात अपयश येत नाही. हा मोलाचा आणि स्वानुभावाचा सल्ला ते आजच्या तरुणांना देतात. तसेच शासकीय योजना फक्त बोर्डवर लावण्यासाठीच नसून स्व-उन्नती साठी असतात. याचे साक्षीदार ते स्वतः असल्याचे सांगतात, असे कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

Related posts

घरपोच बि बियाणे, खत सुविधेची प्रतीक्षा

nirbhid swarajya

” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या कामाच्या ऑनलाईन सर्वेक्षण नोंदीवर संगणक परिचालकांचा बहिष्कार

nirbhid swarajya

Designing The Future: Pineapple House Design

admin
error: Content is protected !!