नातेवाईकांचा आरोप,खामगाव सामान्य रुग्णालयातील घटना
खामगाव:-येथून जवळच असलेल्या मिरा नगर जनुना येथील अनिता या महिलेला बाळंतपणसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान बाळ जन्माला आल्यानंतर त्या नवजात बाळाला पेटीत ठेवण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्या बालकाचा मृत्यू झाला.त्या नवजात बालकाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचे नातेवाईक पांडुरंग वानखडे यांनी केला . रुग्णवाहिका उपलब्ध असूनही सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध होत नाही ,चालक हजर नसतात.असा आरोपीही त्यांनी केला आहे . यावेळी नवजात बालकाचा मृत्यू रात्री होवून , त्याची माहिती सकाळी ९ .३० वाजता देण्यात आली,असा आरोपही नातेवाइकांनी केला
याबाबतची तक्रार नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्याकडे केली असल्याची माहिती नातेवाईकांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे