November 20, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय विदर्भ

डॉ.अमित देशमुख याच्यासह मुख्याधिकारी आकोटकर यांच्यावर कारवाई करा

आकाश सातपुतळे यांची मुख्यमंत्र्यांकडे आँनलाईन लाईन तक्रार

खामगाव : शहरातील शारदा समाज जवळ असलेल्या व्यंकटेश चिल्ड्रन हॉस्पिटल चे संचालक डॉ. अमित देशमुख यांनी त्यांच्या हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या सर्विस गल्लीला आपल्या बंगल्याच्या आत घेतले असून याबाबत सिव्हिल लाइन भागातील सुजान नागरिक आकाश सातपुते यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे त्रकार करत दाद मागीतली आहे.याबाबत आपले सरकार पोर्टल वर आँनलाईन केलेल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, सर्विस गल्लीतून परिसरातील नागरिकांच्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिकेच्या वतीने ३ लाख ८८ हजार रुपयांची तरतूद करून नाली बांधकामाचे टेंडर काढले होते, परंतु सर्विस गल्ली वर डॉ.अमित देशमुख यांनी भले मोठे अतिक्रमण करून ठेवल्यामुळे नालीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आकोटकर यांनी याकडे कुठलेही लक्ष दिले नाही किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई याठिकाणी केली नाही. डॉ. अमित देशमुख यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नालीचे काम रखडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सांडपाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र डॉ. अमित देशमुख अवैध अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरपरिषद चे मुख्याधिकारी आकोटकर यांना महिन्या काठी अर्थपूर्ण सहाय्य तर करत नाही आहेत ना ? अशी शंका उपस्थित होत आहे.अनेक तक्रारीनंतरही डॉक्टर अमीत देशमुख यांनी सर्व्हिस गल्लीवर केलेले अतिक्रमण जैसे थे असल्यामुळे तक्रारकर्त्याने आता थेट आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवरच नव्हे तर थेट मुख्याधिकारी यांच्यावर सुध्दा आता कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.सिव्हील लाईन भागातील आकाश विठ्ठलराव सातपुतळे यांनी प्रभागातील मंजुर झालेली नाली निर्मितीसाठी नगर परिषदमध्ये विनंती अर्ज केला होता. मात्र ज्या ठिकाणी नाली मंजुर झाली आहे त्या जागेवर डॉ.अमित देशमुख यांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम करत शेड बांधले आहे. तसेच सेफ्टी टॅंकही बांधले आहे. त्यामुळे या परिसरातील विकासकामाला खिळ बसली आहे. याबाबत न्याय मिळत नसल्याने तक्रारकर्ते आकाश सातपुतळे यांनी आपले सरकार पोर्टलव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच तक्रार दाखल केली असून सदर अतिक्रमण हटवून अतिक्रमण धारकांना अभय देणाऱ्या मुख्याधिकारी मनोहर आकोटकर यांच्यावर सुध्दा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात केली आहे.

चौकट
नाली नसल्यामुळे पाणी घाण पाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.परिसरातील नागरिक आता आंदोलनाच्या तयारी आहेत तसेच लोकप्रतिधींनी याकडे लक्ष द्यावे.अन्यथा आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related posts

सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या पती सासूसह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल…

nirbhid swarajya

दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट

nirbhid swarajya

अल्पवयीन मुलीचा प्रियकरासोबत फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न…

nirbhid swarajya
error: Content is protected !!