April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र

बोलेरोच्या खिडकीचा काच फोडून २ लाख ८५ हजार लंपास

पंचायत समिती नजीक भरदिवसा घडली घटना

खामगाव:पैशांची बॅग असलेल्या बोलेरोच्या खिडकीचा काच फोडून अज्ञात चोरटयाने त्यातील २ लाख ८५ हजार रुपये लंपास केल्याची घटना आज दुपारी पंचायत समिती परिसरात घडली.यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस चोरटयाचा शोध घेत आहे .जळगाव खान्देश येथील टायर विक्रीचा व्यवसाय करणारे व्यापारी मुकेश पटेल ( ४५ ) हे आज वसूली करत बोलेरो वाहनाने खामगाव येथे आले होते.वसूली केलेले सर्व पैसे त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले व ती बॅग बोलेरोत ठेवून त्यांनी गाडी खामगाव पंचायत समितीनजीक उभी केली व ते जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले . यासंधीचा फायदा घेत अज्ञात चोरटयाने सदर बोलेरोच्या खिडकीचा काच फोडून आतमधील २ लाख ८५ हजार असलेली बॅग लंपास केली . पटेल हे जेवण करून परत आले असता ही घटना निदर्शनास आली . यामुळे घाबरलेल्या पटेल यांनी शहर पोलिस स्टेशन गाठून याबाबत पोलिसांना सांगितले लगेच शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे .

Related posts

जलंब पो.स्टे च्या ठाणेदाराचे तडकाफडकी निलंबन

nirbhid swarajya

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही!

nirbhid swarajya

भालेगाव सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा…

nirbhid swarajya
error: Content is protected !!