November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा शेगांव

रेतीसाठी खोदलेल्या खड्यात पडून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

शेगाव : तालुक्यातील भोनगाव येथील नदीपात्रात रेतीसाठी जेसीबीद्वारे खोदलेल्या खड्यात पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार १५ मार्च रोजी दुपारी ३ च्या दरम्यान कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आजीसोबत अर्जुन अनील भारसाकळे वय १२ याचा नदीपात्रात रेतीचा उपसा केल्याने पडलेल्या गड्यात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली त्यानंतर आजीने आरडा ओरडा करून आसपासच्या नागरिकांच्या साहायाने त्याला बाहेर काढून सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीय शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता पोलीस प्रशासनाकडून तोंडी तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. “तोंडी तक्रार घेऊ शकत नाही लेखी आणा” असे पोलिसांनी संगीतल्यानचे मृतकाच्या वडिलांचे म्हणणे होते त्यामुळे नातलग संतप्त झाले व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली ‘पोलीस प्रशासन हाय हाय…गुन्हे दाखल झालेच पाहिजे..मृतकाला न्याय मिळालाच पाहिजे…अशा घोषणा देण्यात आल्या. तर सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पहुरकर, शेतकरी क्रांती संघटनेचे नेते गजानन बिलेवार, प्रकाश भारसाकळे यांच्या मध्यस्तीने मृतकाच्या नातलगांना समजावून सांगत वाद मिटविण्यात आला असून पोलिसांकडून मर्ग दाखल करीत उचित कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Related posts

जळगांव जामोद येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका व दर्शन सोहळा…

nirbhid swarajya

सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या पदाधिकाऱ्यांना पिकअपची धडक

nirbhid swarajya

ट्रक भिंतीवर धडकून भिंतिच्या मलब्याखाली दबून१ जण ठार; २ जण जखमी

nirbhid swarajya
error: Content is protected !!