भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश खेकडे यांच्या पाठपुराव्याला यश.
खामगाव :- तालुक्यातील अटाळी येथील शेतकऱ्यांच्या समस्यांचे पोखरा अधिकारी सुरळकर यांनी निराकरण करून १५० शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्यात.या संदर्भात भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश खेकडे यांना शेतकऱ्यांनी समस्या, व अडीअडचणी संदर्भात सांगितले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात पोखरा अधिकारी सुरळकर यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करून ५ दिवसात शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.त्याची दखल घेत पोखरा अधिकारी सुरळकर यांनी अटाळी गावात येऊन १५० शेतकऱ्यांची कामे पूर्ण केली आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रूपेश खेकडे यांनी पाठपुरावा केल्यामुळे शेतकऱ्यांची थांबलेली कामे पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.तर यापुढेही शेतकऱ्यांना काही समस्या असल्यासही त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रुपेश खेकडे यांनी सांगितले आहे.